लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात कारची काच फोडून अडीच लाखांची रोकड लंपास.

वरोऱ्यात कारची काच फोडून अडीच लाखांची रोकड लंपास.

वरोरा | प्रतिनिधी
दिनांक : 21 ऑगस्ट 2026

वरोरा शहरातील आंबेडकर चौक परिसरात कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी, 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी घडली. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0909/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार धनलेश नथ्थूजी भेले (वय 30, रा. आंबेडकर वॉर्ड क्र. 4, माजरी) हे प्लॉट सेलिंगचे काम करतात. 20 ऑगस्ट रोजी ते प्लॉट विक्रीच्या कामासाठी वरोरा येथील रजिस्ट्रार कार्यालयात आले होते. प्लॉटच्या व्यवहारानंतर त्यांना 2 लाख 70 हजार रुपयांचा धनादेश तसेच 500 रुपयांच्या नोटांचे पाच बंडल, अशी एकूण 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड मिळाली. ही रोकड त्यांनी काळ्या रंगाच्या कॉलेज बॅगेत ठेवली.

त्यानंतर तक्रारदार आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाने HDFC बँक, आंबेडकर चौक येथे गेले. वाहन पार्क करून धनादेश जमा करण्यासाठी ते बँकेत गेले. काही वेळाने परत आल्यानंतर त्यांच्या कारच्या चालकाच्या बाजूच्या दरवाजाची काच फुटलेली दिसली. वाहनाची पाहणी केली असता कारमध्ये ठेवलेली काळ्या रंगाची कॉलेज बॅग गायब असल्याचे निदर्शनास आले. या बॅगेत 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती.
या प्रकरणात अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून रोकड असलेली बॅग चोरून नेल्याची तक्रार धनलेश भेले यांनी वरोरा पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी दोन मुले संशयास्पदरीत्या लक्ष ठेवून असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 305 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भाऊराव गौरकर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

.......

Comments