लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

टोल नाक्यावर आंदोलन करून वाहतूक रोखल्याप्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टोल नाक्यावर आंदोलन करून वाहतूक रोखल्याप्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिवसेनेचे नेते मुकेश जीवतोडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल.

वरोरा /चेतन लूतडे १/८/२६

वरोरा–चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल नाक्यावर आंदोलन करून वाहतुकीत अडथळा निर्माण करणे, टोल कर्मचाऱ्यांना धमकावणे व शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी वरोरा पोलिसांनी मुकेश जिवतोडे यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा वरोरा पोलीस ठाण्यात ३१ जुलै २०२६ रोजी दाखल करण्यात आला. 
तक्रारदार  नंदोरी टोल प्लाझाचे व्यवस्थापक असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ ते ३.४५ वाजण्याच्या दरम्यान मुकेश जिवतोडे हे २० ते २५ कार्यकर्त्यांसह नंदोरी टोल नाक्यावर आले. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी टोलच्या एका लेनमध्ये उभे राहून वाहतूक रोखली. तसेच टोल कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत टोलचा डेटा मागितला आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दहा दिवसांत माहिती न दिल्यास टोलची तोडफोड करून बंद पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. 

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले असता संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे टोल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही कर्मचारी कामावरही आले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

वरोरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम १८९(२), १९०, २८५, ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश ज्ञानोबा झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
...............




Comments