लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

रेल्वे कामगारांकडून शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल.

रेल्वे कामगारांकडून शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल
वरोरा | दि. ३ ऑगस्ट २०२६

वरोरा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे येथे रेल्वेचे काम करणाऱ्या काही मजुरांनी एका शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात ३ ते ४ महिला व पुरुष मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार योगेश मंगल दरेकर (रा. डोंगरगाव रेल्वे, ता. वरोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी रेल्वेचे काम करणारे काही मजूर वीजेच्या तारांवर आकडा टाकत असल्याचे दिसल्याने दरेकर यांनी त्यांना याबाबत जाब विचारला होता. त्यानंतर मजुरांनी त्यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास शेतातून घरी जात असताना त्याच मजुरांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी एका मजुराने लोखंडी रॉडने डोक्यावर वार केल्याने ते जखमी झाले. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी वरोरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


Comments