लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

पोलीस स्टेशनसमोरून दुचाकी चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस स्टेशनसमोरून दुचाकी चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल
वरोरा | दि. २८ जुलै २०२६

वरोरा शहरातील पोलीस स्टेशनसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. मंजुषा अनिल सोनटक्के (रा. खरवट, ता. वरोरा) यांच्या पतीने सन २०२५ मध्ये स्प्लेंडर प्लस (क्र. MH-29-AA-9565) ही दुचाकी सुमारे २० हजार रुपयांना खरेदी केली होती. 

दि. ३ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मंजुषा सोनटक्के या पतीसह एका तक्रारीसंदर्भात वरोरा पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी दुचाकी पोलीस स्टेशनसमोरील मुख्य रस्त्यावर उभी करून पोलीस ठाण्यात प्रवेश केला. काही वेळानंतर बाहेर आल्यानंतर दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही वाहनाचा मागमूस लागला नसल्याने अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. 

चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत ₹२०,००० असून, फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुखराज रामचरण यादव करीत आहेत.

Comments