लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भावाला समजावण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल.

भावाला समजावण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल.

वरोरा | दि. ६ ऑगस्ट २०२६
वरोरा तालुक्यातील नागरी येथे किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि. ६) सकाळी घडली. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास उत्तम शेंडे (वय ३२, रा. नागरी, ता. वरोरा) हे मजुरीचे काम करतात. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते गावातील दुकानासमोर आले असता त्यांचा भाऊ धनतीन शेंडे याच्यासोबत अमोल बंडूजी नागोसे (रा. नागरी) हा वाद घालत होता. यावेळी कैलास शेंडे यांनी दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी आरोपीने आपल्या घरातून चाकू आणून कैलास शेंडे यांच्या डाव्या बाजूच्या पोटाजवळ वार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा आणि पुढे सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. 

0871 Publish FIR.pdf.html, 
फक्त बातमी, वरोरा 

...........

Comments