लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

टिळक वार्डातील रेल्वे पुलाखालील रस्ता सिमेंटीकरणासाठी बंद.नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नाला यश.

टिळक वार्डातील रेल्वे पुलाखालील रस्ता सिमेंटीकरणासाठी बंद.

नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नाला यश.

वरोरा : रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणानंतर टिळक वार्ड परिसरात नव्याने रेल्वे पूल बांधण्यात आला. मात्र, पुलाखाली पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने या ठिकाणी सातत्याने पाणी साचत होते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

टिळक वार्ड, सरदार पटेल वार्ड आणि मालवीय वार्डातील नागरिकांसाठी हा पूल वरोरा शहरात ये-जा करण्याचा प्रमुख आणि सोयीचा मार्ग आहे. त्यामुळे पुलाखाली साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

या समस्येची दखल घेत नगरसेवक बंडू देऊळकर यांनी रेल्वे प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करून पुलाखालील रस्त्याचे सिमेंटीकरण तसेच बाजूच्या नालीची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने परवानगी मिळविण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून २७ ऑगस्टपासून या कामाला सुरुवात होत आहे.

या कामामध्ये पुलाखालील रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी बाजूच्या नालीची डागडुजी करण्यात येणार आहे. कामादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पुलाखालील रस्ता दोन ते तीन दिवस बंद ठेवण्याची शक्यता आहे.

त्यामुळे टिळक वार्ड, सरदार पटेल वार्ड आणि मालवीय वार्डातील नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांची ये-जा वरोरा शहरातील मुख्य पुलावरून सुरू राहणार आहे.

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला पाणी साचण्याचा प्रश्न या कामामुळे कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा असून, नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


नगरसेवक अनिल झोटिंग यांच्या प्रयत्नामुळे बोर्डा चौकातील रेल्वे पुलाचे काम सुरू झाले आहे.


याच पद्धतीने बोर्डा चौकतील वरोरा शहरात जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली सुद्धा सिमेंटचे काँक्रिटीकरण तात्काळ होत आहे. यासाठी येथील नगरसेवक अनिल झोटिंग यांनी प्रयत्न केले. त्यानंतर लगेच खासदार व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत पाठपुरावा करून रेल्वे प्रशासनाकडून हे काम करून घेण्यात आले आहे. त्यामुळे नक्कीच वरोरा शहरात जाणारी वर्दळ सुलभ होणार आहे.

............


.



Comments