लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भरधाव ट्रॅव्हल्सची बसला धडक; ५० हजारांचे नुकसान

भरधाव ट्रॅव्हल्सची बसला धडक; ५० हजारांचे नुकसान

वरोरा : चंद्रपूर-नागपूर मार्गावर मौजा खांबाडा येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रॅव्हल्सने बसला मागून धडक दिल्याची घटना ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.२० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात बसचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

 तक्रारदार गिरीधर भाऊजी रेवतकर (वय ५४) हे वर्धमान नगर बस डेपो, नागपूर येथे बसचालक म्हणून कार्यरत आहेत. ते ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता बस क्रमांक MH-40-AQ-6191 घेऊन नागपूरहून चंद्रपूरकडे गेले होते. परतीच्या प्रवासात खांबाळा येथील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ ते बसचा वेग कमी करून मार्गक्रमण करीत असताना मागून येणाऱ्या MH-40-AT-0481 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने बसला धडक दिली.
या धडकेत बसच्या मागील भागातील बफर, पत्रा, गेट व मागील काच यांचे नुकसान झाले. नुकसानाची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचेही FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात FIR क्र. 0876/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 125(a), 281 व 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.२४ वाजता FIR नोंदविण्यात आली.
प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश काशीनाथ मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Comments