लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चिरघर प्लॉटमधील नजूल जमिनी फ्री-होल्ड करण्याची मागणी; राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन


चिरघर प्लॉटमधील नजूल जमिनी फ्री-होल्ड करण्याची मागणी; राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन

वरोरा | दि. 31 जुलै 2026

वरोरा नगर परिषद हद्दीतील कमला नेहरू प्रभाग क्रमांक 10 मधील चिरघर प्लॉट परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या ताब्यातील नजूल व भाडेपट्ट्यावरील (Leasehold) निवासी भूखंड भोगवटादार वर्ग-1 (स्वमालकी/Free Hold) मध्ये रूपांतरित करून मालकी हक्क प्रदान करावा, तसेच सदनिका व मालमत्ता पत्रकात नोंद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांना सामूहिक निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चिरघर प्लॉट परिसरातील अनेक कुटुंबे गेल्या 30 ते 40 वर्षांपासून या भूखंडांवर वास्तव्यास आहेत. नगर परिषद व शासनाच्या तत्कालीन धोरणानुसार लिलाव प्रक्रियेद्वारे त्यांना हे निवासी भूखंड देण्यात आले होते. रहिवासी नियमितपणे नगर परिषदेचा मालमत्ता कर व नजूल भाडे भरत असूनही आजपर्यंत त्यांना पूर्ण मालकी हक्क मिळालेला नाही.

भाडेपट्ट्याची मुदत संपल्यामुळे कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली आहे.
वर्ग-2 च्या अटींमुळे बँक कर्ज व इतर आर्थिक सुविधा मिळण्यात अडथळे येत आहेत.
थेट मालकी हक्क नसल्यामुळे वारस नोंदणी, खरेदी-विक्री व मालमत्तेचे हस्तांतरण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निवेदनात महसूल व वन विभागाच्या 16 मार्च 2024 व 26 ऑगस्ट 2025 च्या धोरणांचा तसेच 25 मार्च 2026 रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयाचा संदर्भ देत, निवासी प्रयोजनासाठी वापरात असलेल्या नजूल जमिनी भोगवटादार वर्ग-1 (फ्री-होल्ड) मध्ये रूपांतरित करून रहिवाशांना कायमस्वरूपी मालकी हक्क देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या विषयावर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी निवेदनाच्या प्रती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे, उपविभागीय अधिकारी तसेच मुख्याधिकारी, नगर परिषद वरोरा यांना देण्यात आल्या आहेत.

हे निवेदन संजू विक्रम राम यांच्या नेतृत्वाखाली राहुल दागमवार, प्रशांत सरुडकर, रोशन उगले, देऊळकर काकाजी, काळे काकाजी, वरुडकर काकाजी, काकडे काकाजी, रवी वाटकर, महेश बोधाने, राजू पराते, रवी महागमकर, राहुल मालवे, निशांत वरुडकर, कैलास पारशिवे तसेच चिरघर प्लॉट परिसरातील बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.
.........

Comments