लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा पोलिसांची अवैध देशी दारू विक्रेत्यांवर सलग कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

वरोरा पोलिसांची अवैध देशी दारू विक्रेत्यांवर सलग कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

वरोरा, दि. 6 ऑगस्ट 2026 :

 वरोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी शहरातील विविध ठिकाणी धाड टाकून अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तिन्ही कारवायांमध्ये एकूण ₹2,150 किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध कलम 65(ई) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत
पहिल्या कारवाईत दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6.35 ते 7.15 या वेळेत शेंबळ टोलनाका परिसरातील कृष्णा ढाब्यावर छापा टाकून संतकुमार हरिनाम भारती (रा. माजरी) याच्याकडून 22 रॉकेट देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹880) जप्त करण्यात आल्या. � 

दुसऱ्या कारवाईत दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8.15 ते 8.45 दरम्यान वरोरा रेल्वे स्टेशनसमोरील पानटपरीवर छापा टाकून समीर रामभाऊजी डोटे (रा. व्होल्टेज कॉलनी, वरोरा) याच्याकडून 18 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹720) जप्त करण्यात आल्या. � 

तिसऱ्या कारवाईत दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.15 ते 5.45 या वेळेत जाजू चौक येथील फळ विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकून बालाजी ऊर्फ रविंद्र वासुदेव वासेकर (रा. हनुमान वॉर्ड, वरोरा) याच्याकडून 11 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹550) जप्त करण्यात आल्या. � 

तीन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 च्या कलम 65(ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक अशोक महादेव ढोके यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे. 
..............

Comments