लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जिल्हा नियोजन निधीत खासदारांना १० टक्के कोटा मिळायलाच हवा*

*जिल्हा नियोजन निधीत खासदारांना १० टक्के कोटा मिळायलाच हवा*

*खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात मविआच्या खासदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*

 *विविध विकासकामांसाठी मागितला निधी*  

चंद्रपूर : लोकसभा मतदारसंघाचा अथांग विस्तार आणि त्या तुलनेत मिळणारा अत्यंत अपुरा खासदार निधी यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे खोळंबत असल्याने, महाविकास आघाडीच्या खासदारांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तातडीने अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

सध्या खासदार निधीअंतर्गत वर्षाला केवळ ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो, जो एका मोठ्या मतदारसंघातील शेकडो गावांच्या विकास गरजा भागवण्यासाठी अत्यंत तोकडा पडत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रस्ते, पायाभूत सुविधा व इतर नागरी कामे करताना मोठ्या अडचणी निर्माण होत असून, राज्य शासनाने आपल्या विविध योजनांमधून लोकप्रतिनिधींना पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे खासदारांनी निदर्शनास आणून दिले.

या समस्येवर तोडगा म्हणून खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे ५ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत, ज्यामध्ये जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन विकास निधीच्या वार्षिक बजेटमधून १० टक्के निधी खासदारांच्या शिफारशीनुसार देण्यात यावा ही मुख्य मागणी आहे. याशिवाय राज्याच्या अर्थसंकल्पातून सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना आणि केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-दोन रस्ते व विकासकामे खासदारांच्या शिफारशीनुसार मंजूर करण्याची विनंती करण्यात आली आहे, तसेच राज्य परंपरेनुसार बजेट अधिवेशनापूर्वी सर्व खासदारांची बैठक घेण्याची मागणी केली आहे.

या निवेदनावर खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार वर्षा गायकवाड, खासदार प्रणिती शिंदे,खासदार बळवंत वानखेडे आणि खासदार शामकुमार बर्वे यांच्या प्रमुख स्वाक्षऱ्या असून, लोकप्रतिनिधींच्या या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्य सरकारने यावर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली आहे.

Comments