लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

रस्त्यावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमीट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; वरोरा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये कारवाई

*रस्त्यात उभ्या ट्रकला दुचाकीची धडक*
*तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी*

*ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा*

वरोरा 3/8/26
वरोडा तालुक्यातील कुचना टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने दुचाकी वरील 32 वर्षीय तरुणांचा मृत्यू तर त्याचे सोबत असलेली तरुणी गंभीर झाली. सदर घटना एक ऑगस्ट रोजी रात्र काढली. 

कोणताही इंडिकेटर किंवा इशारा न देता उभ्या करण्यात आलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक दिली.या प्रकरणी वरोडा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती तालुक्यातील कुचना येथील  स्वप्नील बावणे (वय ३२) हा १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता काही कामानिमित्त वरोडा येथे आला होता. काम आटोपल्यानंतर तो आपल्या ओळखीच्या महालक्ष्मी मेश्राम हिच्यासोबत मोटारसायकलने कुचनाकडे परत जात असताना रात्र अकराच्या सुमारास कुचना टोलनाक्यापूर्वी रस्त्यावर उभ्या असलेल्या एमएच-३४-बीझेड-२७८७ क्रमांकाच्या ट्रकला त्याच्या दुचाकीची धडक बसली.
अपघातानंतर दोघांनाही तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  स्वप्नील बावणे याला मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या महालक्ष्मी मेश्राम हिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ट्रक चालकाने वाहन रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभे केले होते. वाहनावर कोणताही इंडिकेटर, पार्किंग लाईट अथवा इशारा दर्शविणारी व्यवस्था नसल्याने अंधुक परिस्थितीत दुचाकीस्वाराला ट्रक दिसला नाही आणि हा भीषण अपघात घडला.

वरोडा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments