लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे २७ ऑगस्टला मोफत सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिरन्यूरोलॉजी व नेफ्रोलॉजी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन; इंदिरा गांधी मार्गावरील सयॊग हॉस्पिटलमध्ये आयोजन


लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे २७ ऑगस्टला मोफत सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिर

न्यूरोलॉजी व नेफ्रोलॉजी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन; इंदिरा गांधी मार्गावरील सयॊग हॉस्पिटलमध्ये आयोजन

वरोरा, दि. २६ ऑगस्ट : एम. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्रांतर्गत लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर यांच्या वतीने वरोरा शहरात मोफत सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत इंदिरा गांधी मार्गावरील सयॊग हॉस्पिटल, वरोरा येथे होणार आहे.

या शिबिरात न्यूरोलॉजी आणि नेफ्रोलॉजी या दोन महत्त्वाच्या वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषतः मेंदू, मज्जासंस्था तसेच मूत्रपिंडाशी संबंधित तक्रारी असलेल्या नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.

न्यूरोलॉजी विभागात कोणत्या तक्रारींवर मार्गदर्शन?

पाठदुखी, मानदुखी, डोकेदुखी, कानात आवाज येणे, एका हात-पायात दुखणे, हात-पायात मुंग्या येणे, ब्रेन ट्यूमर, स्पायनल ट्यूमर, पक्षाघात, काम केल्यानंतर किंवा चालल्यानंतर दुखणे, एका हातापायात कमजोरी येणे, तसेच मानेचा व कंबरेचा स्पॉन्डिलायसिस यांसारख्या तक्रारींबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

नेफ्रोलॉजी विभागात मूत्रपिंडाच्या आजारांची तपासणी

पाय, घोटे, चेहरा किंवा डोळ्यांच्या आसपास सूज येणे, लघवीमध्ये रक्त येणे, लघवीचा रंग लाल किंवा तपकिरी होणे, कंबर किंवा किडनीच्या भागात दुखणे, विनाकारण वजन कमी होणे, रक्तदाब वाढणे, शरीराला खाज येणे, सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, भूक कमी लागणे, मळमळ किंवा उलटी होणे यांसारखी लक्षणे असलेल्या नागरिकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती

न्यूरोलॉजी विभागासाठी डॉ. स्वप्नेश चिंधालोरे (एमबीबीएस, एमएस जनरल सर्जरी, एमसीएच न्यूरोसर्जरी) तसेच नेफ्रोलॉजी विभागासाठी डॉ. मोहित कुरुंदवाडकर (एमबीबीएस, एमडी, डीएनबी नेफ्रोलॉजी) यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

ग्रामीण व शहरातील नागरिकांना दर्जेदार तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी आणि गंभीर आजारांची लक्षणे वेळेत ओळखून योग्य उपचाराचा मार्ग मिळावा, या उद्देशाने या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या आरोग्याशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष न करता या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर
फोन : 07104-665000 / 7888006623

............


Comments