लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मिलन चौकात सट्टापट्टीचा जुगार; १,०१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

मिलन चौकात सट्टापट्टीचा जुगार; १,०१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
वरोरा | दिनांक : 9 ऑगस्ट २०२६

वरोरा शहरातील मिलन चौक परिसरात सार्वजनिक रोडवर सट्टापट्टीचा जुगार खेळविणाऱ्या एका इसमाविरुद्ध वरोरा पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी धिरज मनोहर मेश्राम (वय ३८, रा. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, वरोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.४० ते ५.१० वाजेदरम्यान वरोरा पोलिसांचे पथक हद्दीत जुगार प्रतिबंधक कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मिलन चौक येथील सार्वजनिक रोडवर पाहणी केली असता एक इसम लोकांकडून पैसे घेऊन पैशाचा हार-जीतचा सट्टापट्टीचा जुगार खेळताना आढळून आला.
पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता सट्टापट्टीचा आकडा लिहिलेला कागद, एक निळ्या रंगाचा बॉलपेन आणि रोख १,०१० रुपये, असा एकूण १,०१५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.
या प्रकरणी तक्रारदार पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश काशीनाथ मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Comments