लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण ताब्यात, ७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वरोऱ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण ताब्यात, ७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
वरोरा | प्रतिनिधी

वरोरा शहरातील यात्रा वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी धाड टाकून पाच जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह पत्ते असा एकूण ७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ३.४५ वाजेदरम्यान मौजा आठवडी बाजार, शिवमंदिरालगत, यात्रा वॉर्ड, वरोरा येथे करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता काही इसम ५२ पत्त्यांवर पैशांचा हार-जीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी कारवाई केली असता पाच जण घटनास्थळी मिळून आले, तर काही जण तेथून पळून गेले.
कारवाईदरम्यान ६ हजार ३१० रुपये रोख रक्कम आणि ५२ पत्ते असा मुद्देमाल घटनास्थळावरून मिळाला. तसेच संशयितांच्या अंगझडतीतून अनुक्रमे १८०, ३३०, १२०, ३१० आणि २९० रुपये अशी एकूण १ हजार २३० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी धनखील शेषराव नगराळे (२७), कुणाल नारायण दायरे (२५), भिमा रामदास दांडेकर (४२), सागर वाल्मीक पाझारे (३२) आणि दिलीप रामचंद्र काळे (४२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलम : महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक ०९०७/२०२६ असून, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.४६ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments