लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात शांतता समितीची बैठक; सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन.

वरोऱ्यात शांतता समितीची बैठक; सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन

सणांदरम्यान कायदा-सुव्यवस्था आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश.

स्वागत मंडळाला डीजे वापरण्यास मनाई.

वरोरा : चेतन लूतडे 
दि. २५ ऑगस्ट २०२६


आगामी गणेशोत्सव, ईद आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने वरोरा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात मंगळवारी (२५ ऑगस्ट) शांतता समितीची बैठक घेण्यात आली.


खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, आमदार करण देवतळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाखल, नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अभय लोहे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम तसेच विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वरोरा हे शांतताप्रिय शहर असून शांतता व सलोख्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्व सण उत्साहात आणि शांततेत साजरे करावे अकरा वाजेपर्यंत तरी गणपती विसर्जन करण्याची मुभा  द्यावी. स्वागत मंडळांनी मोठे डीजे लावू नये एक साधा माइक लावून गणपती मंडळाचे स्वागत करावे . सणांच्या काळात पोलीस प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेत नागरिकांना सहकार्य करावे, असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.

सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी. शांतता समिती तसेच गणेश मंडळांच्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश आमदार करण देवतळे यांनी प्रशासनाला दिले.


बैठकीत डीजेचा वापर, गणेशोत्सव व विसर्जनाचे नियोजन, विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता आणि सुरक्षितता राखणे, तसेच मिरवणुकीच्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवणे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

न्यायालयाने घालून दिलेले नियम आणि प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच वाद्य व डीजेचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केले. आगामी सर्व सण जातीय सलोखा आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरे करून शहराची शांतता व सामाजिक ऐक्य कायम ठेवण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.

बैठकीचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाखल यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी सूत्रसंचालन केले, तर पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.

....


.....

Comments