लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मंदिराच्या सौंदर्यीकरणाच्या वादातून महिलेसह पतीवर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मंदिराच्या सौंदर्यीकरणाच्या वादातून महिलेसह पतीवर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
वरोरा | दि. १ ऑगस्ट २०२६

वरोरा तालुक्यातील माढेळी येथे पंचमुखी हनुमान मंदिराच्या सौंदर्यीकरणाच्या कामावरून झालेल्या वादातून एका महिलेला शिवीगाळ, मारहाण तसेच तिच्या पतीवर लोखंडी रॉड व लाकडी काठीने हल्ला केल्याप्रकरणी वरोरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. वासाडे (रा. माढेळी, ता. वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. पंचमुखी हनुमान मंदिराच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला विरोध असल्याच्या कारणावरून आरोपींकडून वारंवार वाद घातला जात असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. 

दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी आरोपींनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून बदनामीकारक आरोप केले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा वाद झाल्यानंतर आरोपींनी महिलेचे केस ओढून मारहाण केली. हा वाद सोडविण्यास आलेल्या तिच्या पतीवर लोखंडी रॉड व लाकडी काठीने हल्ला करण्यात आला. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

या प्रकरणी कैलास पंधरे, वंदना कैलास पंधरे, समीर कैलास पंधरे आणि अश्विनी कैलास पंधरे (सर्व रा. माढेळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम 115(2), 118(1), 296, 3(5) आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 


Comments