लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात क्रांती ज्योत यात्रेचे अहेतेशाम अली मित्र परिवारातर्फे भव्य स्वागत

वरोऱ्यात क्रांती ज्योत यात्रेचे अहेतेशाम अली मित्र परिवारातर्फे भव्य स्वागत

वरोरा : श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथून ९ ऑगस्ट रोजी निघालेल्या श्री गुरुदेव क्रांती ज्योत यात्रेचे वरोरा नगरीत अहेतेशाम अली मित्र परिवारातर्फे आलिशान लॉन येथे भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी क्रांती ज्योत यात्रा तसेच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे पूजन करून दर्शन घेण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी भक्तिभावाने क्रांती ज्योत आणि पालखीचे स्वागत केले.

या कार्यक्रमाला श्री. लक्ष्मणरावजी गमे, माजी सर्वाधिकारी; श्री. अहेतेशाम अली, माजी नगराध्यक्ष व गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य; श्री. रूपलालजी कावळे, चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख; श्री. वसंतराव निखाडे, वरोरा तालुका सेवाधिकारी; श्री. संतोषराव जीवतोड, वरोरा तालुका प्रचार प्रमुख; सौ. चंद्रकलाताई मत्ते, नरेंद्रजी मते यांच्यासह वरोरा तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी महिला व पुरुष कार्यकर्ते, गुरुदेव सेवा उपासक तसेच वरोरा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती ज्योत यात्रेच्या स्वागतामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


Comments