लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात पिस्तूल व १० जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत

वरोऱ्यात पिस्तूल व १० जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत
वरोरा | प्रतिनिधी
दिनांक : १७ ऑगस्ट २०२६

वरोरा शहरातील वडर वस्ती परिसरात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने कारवाई करत एका व्यक्तीस पिस्तूल, दोन मॅगझीन व १० जिवंत काडतुसांसह अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडून वरोरा विभागात पेट्रोलिंग व अवैध धंद्यांवर कारवाई सुरू होती. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सत्यन टॉकीजच्या मागे, वडर वस्ती, वरोरा येथे राहणारा संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने (वय ४६ वर्षे) याच्या घराची झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान घरातून एक पिस्तूल, दोन मॅगझीन व १० जिवंत काडतुसे असा अवैध शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला असून आरोपीकडून मोबाईलसह एकूण अंदाजे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अपराध क्र. १०२/२०२६, कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक दीपक कांबेकडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Comments