लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा पोलिसांची धडक कारवाई; बकरे चोरीचा २४ तासांत छडापाच बकऱ्यांसह ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपी ताब्यात

वरोरा पोलिसांची धडक कारवाई; बकरे चोरीचा २४ तासांत छडा

पाच बकऱ्यांसह ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपी ताब्यात

वरोरा, दि. २९ ऑगस्ट : मजरा (रै.) येथील गोठ्यातून चोरीस गेलेल्या पाच बकऱ्यांचा वरोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोध घेत चोरीचा छडा लावला. या कारवाईत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या पाच बकऱ्यांसह एकूण ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी किशोर अशोक कोल्हे, रा. मजरा (रै.), ता. वरोरा, जि. चंद्रपूर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्या रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या होत्या. चोरीस गेलेल्या बकऱ्यांची किंमत सुमारे २५ हजार रुपये होती. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ९२१/२०२६, कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता (भा. न्या. सं.) २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

     वरोरा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के

गुन्हा दाखल होताच वरोरा पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. तसेच महामार्गालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून गोपनीय माहितीच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान सुरज शिवगीरी सोळकी (वय २७), रा. इंदिरा नगर, अयोध्या नगर, चंद्रपूर; खुबलाल हिरासिंग ठाकूर (वय २५), रा. संजय नगर, दुर्गा वार्ड, चंद्रपूर; आणि राकेश राजेंद्र महतो (वय ३८), रा. शाम नगर, आंबेडकर चौक, बंगाली कॅम्प, चंद्रपूर यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या पाच बकऱ्या (किंमत २५ हजार रुपये), स्वीफ्ट डिझायर कार क्र. एमएच १२ एफयू ८८१९ (किंमत ५ लाख रुपये) आणि होंडा मोटारसायकल क्र. एमएच ३४ सीसी ४३५४ (किंमत ४५ हजार रुपये) असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कष्टाने वाढविलेल्या बकऱ्या अवघ्या २४ तासांत परत मिळाल्याने फिर्यादी किशोर कोल्हे यांनी वरोरा पोलिसांच्या तत्परता, मेहनत आणि प्रभावी कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि प्रभारी अधिकारी ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे, पोलीस उपनिरीक्षक मनीष तालेवार तसेच पोलीस कर्मचारी सुखराज यादव, अमोल नवघरे, प्रशांत नागोसे, महेश गावतुरे, सौरभ कुलते, विशाल राजुरकर आणि मनोज ठाकरे यांच्या विशेष पथकाने केली.

.......


Comments