लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात बंद घराचे कुलूप तोडून ४३ हजारांचा ऐवज लंपास

वरोऱ्यात बंद घराचे कुलूप तोडून ४३ हजारांचा ऐवज लंपास

वरोरा | दि. २८ ऑगस्ट २०२६

वरोरा शहरातील नंदनवन लेआउट, टिकळ वॉर्ड परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी निल पांडुरंग पंम्पनवार (वय ५९) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे पत्नीसमवेत नंदनवन लेआउट, टिकळ वॉर्ड, वरोरा येथे राहतात. त्यांची मुलगी वणी येथे राहत असून तिच्या घरी कार्यक्रम असल्याने तक्रारदार व त्यांची पत्नी २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता घराला कुलूप लावून वणी येथे गेले होते.

२७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ते दोघे वरोरा येथील घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याने चोरी झाल्याचा संशय आला. त्यानंतर कपाटाची पाहणी केली असता त्यामध्ये ठेवलेली २ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ (अंदाजे किंमत २० हजार रुपये), १० ग्रॅम चांदीची चाळ (१० हजार रुपये), ५ ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट-वाटी-प्याला (५ हजार रुपये), पैशांचा गल्ला (३ हजार रुपये) तसेच ५ हजार रुपये रोख, असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०९२०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIR ची नोंद २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.४१ वाजता करण्यात आली.

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीष जगन्नाथ तळेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Comments