लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*विष्णू मंदिराच्या जागेवर वॉटर एटीएम बांधण्यास नागरिकांचा विरोध.**संत गाडगेबाबा प्रभागातील घटना**सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता*

*विष्णू मंदिराच्या जागेवर वॉटर एटीएम बांधण्यास नागरिकांचा विरोध.*

*संत गाडगेबाबा प्रभागातील घटना*

*सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता*

वरोडा : शाम ठेंगडी/८/८/२०२६

 शहरात विकासात्मक कार्य झाली पाहिजे. पण ती करताना सामाजिक सलोखा बिघडू न देण्यासाठी कोणत्याही  प्राचीन धार्मिक स्थानांचा विध्वंस न करता व्हावीत हे अभिप्रेत असताना मात्र वरोड्यातील संत गाडगेबाबा प्रभागात वॉटर एटीएम बांधण्यासाठी यास छेद देणारी घटना घडण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या या संभाव्य जागेवर एटीएम बांधण्यास त्या वार्डातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. 
      ‌‌ शहरातील संत गाडगेबाबा प्रभाग क्रमांक सात मधील जीवतोडे यांच्या घराजवळील परिसरात भगवान विष्णूची मूर्ती आहे .भगवान विष्णूचे सदर मंदिर हे प्राचीन असून त्या पुरातन मूर्तीची नागरिकांकडून रोज पूजा अर्चना केली जाते. या मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी नागरिकांनी विष्णू मंदिर पुनरुत्थान समितीची स्थापना केली आहे.
            या समितीतर्फे सदर मंदिराचे बांधकाम करताना नगरपरिषद व नागरिकांना कोणती अडचण येणार नाही असे आशयाचे अशा आशयाचे हमीपत्र नगर परिषदेला  देण्यात आले आहे 
        मात्र नगर परिषदेतर्फे वार्डातील या जागेवर वॉटर एटीएम चे बांधकाम करण्याचे ठरत असून सदर जागेवर वॉटर एटीएम चे बांधकाम करण्यास नागरिकांचा विरोध आहे. प्राचीन काळापासून असलेल्या या भगवान विष्णूच्या मंदिराच्या जागेवर  वॉटर एटीएमचे बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला तर धार्मिक भावना दुखावून सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वॉटर एटीएम वार्डातील सदर जागेवर न बांधता इतरत्र दुसऱ्या जागेवर बांधण्यात यावे. जेणेकरून वार्डातील शांतता अबाधित राहील व वार्डातील नागरीक एकोपाने राहतील अशी भावना विष्णू मंदिर पुनरुत्थान समिती ने व्यक्त केली आहे.


Comments