लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आरोपीस अखेर अटक वरोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; इंदूरमध्ये सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात

फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आरोपीस अखेर अटक

वरोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; इंदूरमध्ये सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात

वरोरा, दि. २७ ऑगस्ट २०२६ : फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला वरोरा पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून सापळा रचून अटक केली. विनोद श्यामराव सोयाम (वय ४०), रा. शिवनेरी नगर, देशपांडे पेट्रोलपंपामागे, वरोरा, जि. चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय अमरचंद सोनी धंदा सोनार, रा. समाधी वॉर्ड, सकाटे मंदिराजवळ, चंद्रपूर यांनी तोंडी रिपोर्ट दिल्यानंतर एकूण ८१ लाख ५० हजार रुपयांच्या रोख रकमेच्या फसवणुकीप्रकरणी वरोरा पोलिस ठाण्यात अप. क्र. १३४/२०२५, कलम ३१८(४), ३(५), भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच शिवकुमार रामचंद्र गुप्ता, रा. शांतिनगर, तुळशी नगर कॉलनी, नागपूर यांच्या तोंडी रिपोर्टवरून ५६ लाख ५० हजार रुपयांच्या रोख रकमेच्या फसवणुकीप्रकरणी अप. क्र. ४८४/२०२६, कलम ३१८(४), ३(५), भारतीय न्याय संहिता अन्वये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपी विनोद श्यामराव सोयाम हा फरार होता. तो पोलिसांना वारंवार गुंगारा देत आपले ठिकाण बदलत असल्याने त्याला ताब्यात घेणे वरोरा पोलिसांसमोर आव्हान ठरले होते.

मात्र, पोलिसांनी हे आव्हान स्वीकारत चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि वरोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

वरोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी स्वतंत्र पथक तयार करून आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. तांत्रिक माहिती तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवण्यात आला. अखेर पोलिस पथकाने मध्य प्रदेशातील इंदूर शहरात सापळा रचून नियोजनबद्ध कारवाई करत फरार आरोपी विनोद श्यामराव सोयाम याला ताब्यात घेत अटक केली.

आरोपीकडून पुढील तपास सुरू असून फसवणुकीच्या या प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार, तसेच पोलीस स्टाफ पोलीस हवालदार रुपेश मुल्लेमवार, पोलीस हवालदार क्रमांक २५७९ संदिप मुळे आणि पोलीस अंमलदार विशाल राजुरकर यांनी केली.
.........................

Comments