लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

पापा जाधव यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी राजुरा शहरात तणाव* राजुरा पोलीस ठाण्यावर नागरिकांचा आक्रोश - शिवाजी चौकात किरकोळ लाठीमार* पोलीस बंदोबस्तात अखेर अंत्यसंस्कार

* पापा जाधव यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी राजुरा शहरात तणाव
* राजुरा पोलीस ठाण्यावर नागरिकांचा आक्रोश - शिवाजी चौकात किरकोळ लाठीमार
* पोलीस बंदोबस्तात अखेर अंत्यसंस्कार

राजुरा, ता.प्र. - 26/8/20/26
            दिनांक २४ ऑगस्ट रोजी राजुरा न्यायालयाच्या समोर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात राजुरा येथील विनोद उर्फ पापा जाधव, वय ३५  राहणार सोमनाथपूर याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज दिनांक २५ रोजी सोमनाथपूर येथील नागरिक, महिला व नातेवाईक यांनी राजुरा पोलीस ठाणे येथे धुडघूस घातला. यानंतर राजुरा विश्रामगृह समोरील शासकीय विश्राम गृह समोरील चौकात येऊन येथील महिला व नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजुरा पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळत किरकोळ लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर चंद्रपूर येथून आलेल्या दंगा नियंत्रण पथकासह प्रेत सोमनाथपूर येथील पापा जाधव यांचे घरी नेण्यात आले. दरम्यान आज चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. 

          घटना घडताच या प्रकरणातील हल्लेखोर  करण मेकलवार, वय २२ व करण बावीस्कर, वय २४ काल दिनांक २५ रोजी रात्री राजुरा पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. यावेळी घटनेच्या वेळी वापरलेली पिस्तूल आरोपींनी राजुरा पोलिस ठाण्यात जमा केली. आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी पहाटे कार्तिक उमेश खामनकर, वय २२ व परवेज सरवर शेख, वय २३ दोघेही राहणार राजुरा या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या चार आरोपींवर भारतीय न्याय संहिता १०३(१), ३(५), सहकलम ३ (२५), २७ भारतीय शस्त्र कायदा यानुसार राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सचिन लवंडे या संशयित तरूणाला ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी काही आरोपी असल्याची शक्यता असून राजुरा पोलिस अधिक तपास करीत आहेत. आज अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी राजुरा येथे भेट दिली. ठाणेदार नितीन चिंचोळकर अधिक तपास करीत आहे. 
            राजुरा शहरात यापूर्वी तीन खून झाले आणि सर्व आरोपी बाहेर आहेत. याबाबत पोलिस निष्क्रिय असल्याचा आरोप महिलांनी केला. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान पोलिस बंदोबस्तात पापा जाधव याचेवर राजुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतकाचे नांदेड, चंद्रपूर तसेच तेलंगणातून मोठ्या संख्येने आलेले नातेवाईक उपस्थित होते. सध्या राजुरा येथे तणावपूर्ण शांतता दिसून येत असून राजुरा पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
...................



Comments