लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

आनंदवन चौकात बलगर ट्रकची स्टाफ बसला धडक; ५० हजारांचे नुकसान ,भरधाव व निष्काळजी वाहन चालकाविरुद्ध वरोरा पोलिसांत तक्रार.

आनंदवन चौकात बलगर ट्रकची स्टाफ बसला धडक; ५० हजारांचे नुकसान

भरधाव व निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध वरोरा पोलिसांत तक्रार. 

वरोरा | प्रतिनिधी
दिनांक : २१ ऑगस्ट २०२६

वरोरा शहरातील आनंदवन चौकात भरधाव वेगाने आलेल्या बलगर ट्रकने स्टाफ बसला धडक दिल्याची घटना २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४० वाजता घडली. या अपघातात स्टाफ बसच्या डाव्या बाजूच्या पत्र्याचे नुकसान झाले असून अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. सुदैवाने बसमधील कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

तक्रारदार गजानन मणिकर टोंगे (वय ४५) हे स्टाफ बस चालक म्हणून कार्यरत आहेत. ते MH 15 AK 1955 क्रमांकाची टाटा कंपनीची स्टाफ बस घेऊन GMR कंपनीतील कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी जात होते. दरम्यान आनंदवन चौकाजवळ समोरून येणाऱ्या बलगर ट्रक क्रमांक MH 40 BL 6657 च्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून बसला धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
अपघातानंतर बसच्या डाव्या बाजूच्या पत्र्याचे नुकसान झाले. ट्रक चालकाने आपले नाव लालाजी रामाजी मेंढळकर (वय ५६, रा. घुग्घुस, जि. चंद्रपूर) असे सांगितल्याचे नमूद आहे.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0910 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281 व 324(4) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य अनिल पवार यांच्याकडे सोपविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments