लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

एकोना खदान ब्लास्टिंगमुळे अभ्यंकर वॉर्डातील घरांना तडे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.नगरसेविका सौ रोशनी संदीप भडके यांचा जन आंदोलनाचा इशारा.

एकोना खदान ब्लास्टिंगमुळे अभ्यंकर वॉर्डातील घरांना तडे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

नगरसेविका सौ रोशनी संदीप भडके यांचा जन आंदोलनाचा इशारा. 

वरोरा | दिनांक : २४ ऑगस्ट २०२६

वरोरा : वरोरा शहरातील अभ्यंकर वॉर्ड परिसरातील नागरिकांच्या घरांना Western Coalfields Limited (WCL)च्या एकोना कोळसा खाणीतील ब्लास्टिंगच्या कंपनांमुळे तडे जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यंकर वॉर्डातील नागरिकांनी खासदाराना निवेदन देत ब्लास्टिंग तीव्रता तातडीने कमी करण्याची मागणी केली आहे.
अभ्यंकर वॉर्डाच्या पश्चिम दिशेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एकोना कोळसा खाण असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. या खाणीमध्ये दररोज दुपारी ३ वाजल्यानंतर करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे मोठ्या प्रमाणात कंपन जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या कंपनांमुळे अनेक घरांच्या भिंतींना तडे पडत असून, घरांचे प्लास्टर तसेच खिडक्यांचे नुकसान होत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. काही व्यावसायिक इमारतींनाही याचा फटका बसत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात मालमत्तेसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

नुकसानग्रस्त घरांची पाहणी करण्याची मागणी
ब्लास्टिंगमुळे नेमके किती नुकसान झाले आहे, याची प्रशासनाने तातडीने पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच ब्लास्टिंगमुळे निर्माण होणाऱ्या कंपनांची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून त्याचा परिणाम घरांवर होत आहे का, याची तज्ज्ञांकडून पडताळणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षितता लक्षात घेऊन एकोना खाणीतील ब्लास्टिंगवर तातडीने नियंत्रण आणावे किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास जनआंदोलनाचा इशारा येथील नगरसेविका सौ रोशनी संदीप भडके यांनी दिला आहे.
ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत तातडीने उपाययोजना करण्यात आली नाही, तर अभ्यंकर वॉर्डातील नागरिकांच्या वतीने एकोना खाणीविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन खाण व्यवस्थापन, संबंधित अधिकारी आणि नागरिकांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्नावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या संबंधात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन देण्यात आले असून त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घोषित करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देतानी सौ नगरसेविका रोशनी संदीप भडके, नगरसेवक गजानन जीवतोडे, अॅड. गजानन बोढाले, अँड ए आर जांभुळे, डॉक्टर आशिष पिसे, प्राध्यापक पिटगुलवार, अरविंदजी जीवतोडे, डॉक्टर प्रमोद गंपावार, विजय झाडे, विनोद डोमकावळे, सुधाकर हनुमंते, अरुण झाडे , दशरथ सोनकुंमरे आदी प्रतिष्ठित मान्यवरांनी खासदारांना निवेदन दिले.
...............................

पेन्शनर्स असोसिएशन तर्फे नगरसेवक बंडू देऊळकर यांचा सत्कार करण्यात आला. 
....


Comments