लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात २८८ ग्रॅम गांजा जप्त; एकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा.

वरोऱ्यात २८८ ग्रॅम गांजा जप्त; एकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा.

वरोरा | दि. २३ ऑगस्ट २०२६/प्रतिनिधी 

वरोरा शहरातील नवीन वस्ती, कौलरी वॉर्ड परिसरात अमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वरोरा पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाकडून २८८.८६ ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे १४ हजार ५०० रुपये, जप्त केला. या प्रकरणी सुरज ऊर्फ भुऱ्या तेजुराम शाहू (वय २३, व्यवसाय मजुरी, रा. नवीन वस्ती, कौलरी वॉर्ड, वरोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना २१ ऑगस्ट रोजी दुपारी अमली पदार्थाच्या विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंच, वजनकाटा व छायाचित्रकारासह पथक तयार करून संबंधित ठिकाणी कारवाई केली.
पोलिस पथकाने संशयिताच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता एका कापडी पिशवीमध्ये गांजा आढळून आला. वजन केल्यानंतर प्लास्टिक पिशवीसह वजन २९६.४७ ग्रॅम, तर प्लास्टिक पिशवी वजा केल्यानंतर निव्वळ गांजाचे वजन २८८.८६ ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत १४ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) मधील कलम ८(क) व २०(ब) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत माधवराव गौरकर करीत आहेत.

Comments