लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत संस्कार भारती पब्लिक स्कूलचे घवघवीत यश; सहा खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड.

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत संस्कार भारती पब्लिक स्कूलचे घवघवीत यश; सहा खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड.

वरोरा | प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि डावपेचांचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेत संस्कार भारती पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर श्रीहन राऊत, परिधी बोढे, सिद्धी मुथा, प्रज्वल मेश्राम, सम्यक मुथा आणि साहिल पवार यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, प्राचार्या, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेतही अशीच दमदार कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments