लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

रोटरी क्लबचे योगेश डोंगरवार उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित *समाजाभिमुख उपक्रम राबविल्याची पावती*एकूण ८ पुरस्कार प्राप्त.

रोटरी क्लबचे योगेश डोंगरवार  उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित 
*समाजाभिमुख उपक्रम राबविल्याची पावती
*एकूण ८ पुरस्कार प्राप्त.

वरोरा :-येथील  रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश डोंगरवार यांनी २०२५-२६ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट समाजकार्याची दखल घेऊन त्यांना मानाचा “उत्कृष्ट रोटरी अध्यक्ष डिस्ट्रिक्ट ३०३०"हा पुरस्कार ‌ नेपाळ येथील रोटरी क्लबचे आंतरराष्ट्रीय संचालक बसुदेव गोलियान यांच्या हस्ते बहाल करण्यात आला आहे. यासह वरोरा रोटरी क्लबला अन्य सात पुरस्कार प्राप्त झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरुजीत सिंग सेखन , एम. के. झा नेपाळ तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे आणि माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यात रोटरी क्लब वरोरा यांनी आपल्या वर्षभरातील जनोपयोगी व सेवाभावी कार्याची प्रभावी छाप उमटवत तब्बल ०८ पुरस्कार प्राप्त केले.
  सर्वोत्कृष्ट क्लब अध्यक्ष हा मानाचा पुरस्कार अध्यक्ष योगेश डोंगरवार यांना मिळाला. तसेच सर्व रोटरी सदस्यांच्या सामूहिक प्रयत्नांची ही अभिनंदनीय पावती ठरली आहे. वर्षभर सर्व सदस्यांनी केलेल्या एकत्रित कामाची पावती म्हणून हे सर्व पुरस्कार क्लबला मिळाले.
१२१ क्लब्समधून विविध विभागांतील कार्याची घेतलेली ही पुरस्काररूपी दखल म्हणजे रोटरीच्या वर्षभराच्या निरंतर सेवाकार्याला मिळालेली कौतुकाची आणि प्रेरणेची मोठी शाबासकीच असल्याचे म्हटले जात आहे.२५-२६ या वर्षात रोटरी क्लबने वरोरा शहर व ग्रामीण भागातील विविध शैक्षणिक, आरोग्यविषयक, सामाजिक तथा शैक्षणिक उपक्रम अशा अनेक सेवाकार्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
‘सेवा हीच ओळख आणि समाजहित हेच ध्येय’ या भावनेतून कार्यरत असलेल्या रोटरीच्या सेवा कार्याची पुरस्कार रूपाने घेतलेली दखल कौतुकास्पद आहे.
क्लब ला मिळालेल्या पुरस्कारात उत्कृष्ट अध्यक्ष, रोटरी व रोटरॅक्ट यांच्यातील उत्कृष्ट समन्वय व संयुक्त उपक्रम,
 युवा शक्तीला प्रोत्साहन देणारे उत्कृष्ट उपक्रम,पर्यावरण संवर्धनासाठी राबविलेले उल्लेखनीय प्रकल्प,
 युवकांच्या विकासासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेले उत्कृष्ट सेवाकार्य, रोटरी इंटरनॅशनलच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण सेमिनारचे यशस्वी आयोजन, डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स साठी सर्वाधिक नोंदणी, वर्षभरातील उत्कृष्ट समाजकार्य या सर्वांची दखल घेत जिल्हा प्रांतपालांकडून विशेष पुरस्कार,रोटरियन समिर बारई यांना उपक्रमातील उल्लेखनीय सहभागाबद्दल सन्मानचिन्ह, अमित लाहोटी यांना सहाय्यक प्रांतपालांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट रोटरी कार्य केल्याबद्दल  सन्मानचिन्ह असे पुरस्कार वरोरा रोटरी क्लब ला प्राप्त झाले
सदर पुरस्कार म्हणजे रोटरी क्लब वरोराच्या सामाजिक कार्याची व क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांच्या अथक परिश्रमाचे हे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवा विकास, सामाजिक सेवा, रोटरी फाउंडेशन तसेच विविध जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून “Service Above Self” या रोटरीच्या मूलमंत्राला अनुसरून क्लबने वर्षभर सातत्यपूर्ण कार्य केले आहे.या यशाबद्दल रोटरी क्लब वरोराच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, रोटरॅक्ट व इतर सहकारी संस्थांचे कौतुक होत आहे.“पुरस्कार हे केवळ सन्मान नसून, यापासून प्रेरणा घेऊन समाजासाठी आणखी मोठे आणि प्रभावी कार्य करण्याची भावना रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार सचिव राहुल पावडे, कोषाध्यक्ष देवानंद गावंडे वरोरा रोटरी अध्यक्ष अभिजित मणियार आणी संपूर्ण टीम ने व्यक्त केली आहे.

Comments