लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

शिंदे गटाला मोठा धक्का ! वरोरा-भद्रावतीत शेकडो युवकांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

शिंदे गटाला मोठा धक्का ! वरोरा-भद्रावतीत शेकडो युवकांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

वरोरा, चंद्रपूर : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वरोरा-भद्रावती तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
युवासेना प्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आणि युवासेना सचिव आमदार वरूनजी सरदेसाई साहेब तसेच शिवसेना सचिव सुरजभैय्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनात GEN-Z युवकांचा हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या सोहळ्याचे नेतृत्व शिवसेना जिल्हा संघटक तथा बांधकाम सभापती श्री. मनीष मुरली जेठाणी यांनी केले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात शिंदे गटाला मोठे खिंडार पडले असून, शिंदे गटाचे युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि उपतालुका प्रमुख रूपेश चिंचोलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी युवासेना सहसचिव तथा युवती जिल्हा अधिकारी सौ. रोहिणीताई विक्रांत पाटील, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक श्री. संदीपजी रियाल (पटेल), महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. भावनाताई मिथुन खोब्रागडे, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख श्री. राजेशजी नायडू, माजी तालुका प्रमुख तथा स्वीकृत सदस्य न.प. भद्रावती श्री. नंदूभाऊ पढाल, माजी तालुका प्रमुख तथा सरपंच मोहबाळा श्री. नंदलाल टेमुर्डे,कामगार नेते घनश्याम आसवले,प्रमोद वाघ प्रामुख्याने उपस्थित होते.
वरोरा व भद्रावती तालुक्यातील शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसेना प्रेमी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. युवकांच्या या उत्स्फूर्त प्रवेशामुळे वरोरा-भद्रावती परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद आणखी वाढली आहे.

Comments