लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

पावना येथे अवैध देशी दारूवर पोलिसांचा छापा; २२ बाटल्यांसह आरोपी गजाआड.झिलटे यांना रंगेहात पोलिसांनी पकडले.

पावना येथे अवैध देशी दारूवर पोलिसांचा छापा; २२ बाटल्यांसह आरोपी गजाआड.

झिलटे यांना  पोलिसांनी पकडले.

वरोरा (प्रतिनिधी):

पावना गाव परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका इसमावर वरोरा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २२ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पावना येथील एका दुमजली घरासमोर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत अवैध दारूविक्रीची माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला असता दिलीप गणपत झिलटे (वय ४२, रा. पावना) हा संशयास्पद स्थितीत आढळून आला.

​त्याच्या जवळील कापडी पिशवीची पाहणी केली असता, त्यात 'रॉकेट संत्रा' कंपनीच्या ९० मिलीच्या २२ सीलबंद बाटल्या (एकूण १,९८० मिली, किंमत रु. ८८०) मिळून आल्या. दारू विक्रीबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. 

या पहिले सुद्धा पावना गावात अवैध दारू विक्री संबंधात गुन्हे  दाखल असून आत्तापर्यंत कडक कारवाई न झाल्याने गावागावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हि दारू वरोरा येथून ठराविक दुकानातून आणली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात विना लायसन दुकानातून दारू दिली जात आहे. मात्र कारवाई नाममात्र होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

​या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा (क्र. ९०५/२०२६) नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार नरेशकुमार नन्नावरे यांच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक लक्ष्मी गरिबराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Comments