लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

न.प. शिक्षण सभापती योगिता नेरकर यांनी अखेर पाळला शब्द; नर्सरी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापूर्वी शैक्षणिक साहित्याचे वाटप.

न.प. शिक्षण सभापती योगिता नेरकर यांनी अखेर पाळला शब्द; नर्सरी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापूर्वी शैक्षणिक साहित्याचे वाटप.

वरोरा (शहर प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर देशभक्तीपर कार्यक्रमांची धूम सुरू असताना वरोरा नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाने चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला आहे. नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा तथा शिक्षण सभापती योगिता नेरकर यांनी शिक्षण सभापतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नगरपरिषदेच्या सर्व शाळांमध्ये नर्सरी वर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
नर्सरी वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिक्षण सभापती योगिता नेरकर यांनी दिले होते. दिलेला शब्द पाळत नगरपरिषदेच्या वतीने १५ ऑगस्टपूर्वी नर्सरीतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना शाळेची ओढ लागावी आणि शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा, या उद्देशाने नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर नगरपरिषदेचा भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी बोलताना शिक्षण सभापती योगिता नेरकर म्हणाल्या की, ही मुले उद्याचे देश घडविणारे भविष्य आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला जमेल तेवढी मदत करणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे सामाजिक कर्तव्य आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळणार असून, शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, उपनगराध्यक्षा तथा शिक्षण सभापती योगिता नेरकर, गटनेते गजानन मेश्राम, सर्व सभापती, मुख्याधिकारी, नगरसेवक तसेच नगरपरिषदेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

............

Comments