लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मयुरी सुपारे आत्महत्या प्रकरणाला पुन्हा नवे वळण!गर्भपात प्रकरणातील आणखी दोघांना अटक; मुख्य आरोपी डॉ. विश्वास फरार, पोलिसांचा शोध सुरू

मयुरी सुपारे आत्महत्या प्रकरणाला पुन्हा नवे वळण!

गर्भपात प्रकरणातील आणखी दोघांना अटक; मुख्य आरोपी डॉ. विश्वास फरार, पोलिसांचा शोध सुरू

तालूका - प्रतिनिधी

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा (वडगाव) परिसरात २ ऑगस्ट रोजी घडलेल्या मयुरी हरिदास सुपारे यांच्या आत्महत्या प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या तपासात शेगाव पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढवत गुन्ह्यात आणखी एक कलम समाविष्ट केले असून, मृत महिलेच्या पतीचे काका व काकू यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले असून तपासाला नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी डॉ. विश्वास अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली असून, तो लवकरच जेरबंद होईल, असा विश्वास तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब समोर येत असल्याची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, मयुरी सुपारे या जिवंत असताना त्यांच्या वडिलांनी आणि भावाने जून महिन्यात गिरड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, त्यांची तक्रार नोंदवून न घेता त्यांना परत पाठविण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

स्थानिकांमध्ये अशी चर्चा रंगली आहे की, संबंधित तक्रारीची वेळीच दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली असती, तर कदाचित मयुरी सुपारे यांचे प्राण तसेच त्यांच्या पोटातील गर्भ वाचू शकला असता. या पार्श्वभूमीवर गिरड पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणात निष्काळजीपणा झाला का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, शेगाव पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, फरार आरोपी डॉ. विश्वास याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
............

Comments