लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

नंदोरी टोल कंपनीच्या कारभारावर शिवसेनेचा सवाल; प्रशासनाला जाब विचारणारकोट्यवधींची टोलवसुली, मात्र रस्ते व सुविधांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप.

नंदोरी टोल कंपनीच्या कारभारावर शिवसेनेचा सवाल; प्रशासनाला जाब विचारणार

कोट्यवधींची टोलवसुली, मात्र रस्ते व सुविधांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप

वरोरा, दि. ३१ ऑगस्ट : चंद्रपूर-नागपूर मार्गावरील नंदोरी टोल परिसराच्या देखभाल व व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामगार सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुयोग भोयर यांनी WCBTRL टोल कंपनीच्या कारभाराविरोधात प्रशासनाला जाब विचारला आहे. रस्त्याची नियमित देखभाल, खड्ड्यांची दुरुस्ती तसेच वाहनचालकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

सन २०११ पासून नंदोरी येथील चंद्रपूर-नागपूर मार्गाच्या देखभाल व टोल वसुलीची जबाबदारी संबंधित कंपनीकडे आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची योग्य देखभाल केली जात नसल्याने नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे शिवसेना कामगार नेते सुयोग भोयर व शिवसेनेचे नेते मनीषचे जेठाणी यांनी सांगितले.

रस्त्यावरील खड्डे, अपुरी देखभाल आणि सुरक्षेच्या प्रश्नामुळे होणाऱ्या अपघातांबाबतही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. या मार्गावरील अपघातांमध्ये आतापर्यंत किती नागरिकांना जीव गमवावा लागला आणि त्यासाठी जबाबदार कोण? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचाही आरोप करण्यात आला. अपघातांची जबाबदारी निश्चित करून संबंधितांना न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी नंदोरी टोल परिसरात आरटीओ विभागाने कंपनीशी संबंधित काही वाहनांवर नियमभंगप्रकरणी कारवाई केल्याचा मुद्दाही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते, तर रस्ता देखभाल व नागरिकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या टोल कंपनीच्या त्रुटींकडे प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत असताना नागरिकांना करारानुसार आवश्यक सुविधा प्रत्यक्षात मिळत आहेत का? असा सवालही शिवसेनेने केला आहे. टोल मार्गावर रुग्णवाहिका, क्रेन सेवा, प्राथमिक उपचार केंद्र, सुरक्षा व्यवस्था आणि इतर आपत्कालीन सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत की केवळ कागदोपत्री आहेत, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

नंदोरी टोल कंपनीच्या कामकाजाची संबंधित प्रशासनाने सखोल चौकशी करून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच करारातील सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा शिवसेना (उ.बा.ठा.) कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माजी जिल्हाप्रमुख सुयोग भोयर व शिवसेनेचे जिल्हा संघटक मनिष  जेठाणी व शिवसेना युवा जिल्हाप्रमुख निखिल मांडवकर  यांनी दिला.

पत्रकार परिषदेत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, अपघातांची जबाबदारी आणि टोल कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष अंमलबजावणी या मुद्द्यांवर प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली. अनिता शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल अशी तीव्र प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.


Comments