लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा येथे भव्य तिरंगा रॅली; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — आ. करण देवतळे

वरोरा येथे भव्य तिरंगा रॅली; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — आ. करण देवतळे

वरोरा : देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी वरोरा शहरात आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक रॅलीमध्ये वरोरा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार करण देवतळे यांनी केले आहे.

रॅलीची सुरुवात 13 ऑगस्ट ला दुपारी २ वाजता शहीद योगेश डाहूले स्मारक येथून होणार आहे. रॅलीचा मार्ग शहीद योगेश डाहूले स्मारक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – पद्मावार चौक – नेहरू चौक – मित्र चौक – डोंगरवार चौक – वीर सावरकर चौक – महात्मा ज्योतिबा फुले चौक असा राहणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

या ऐतिहासिक आणि भव्य तिरंगा रॅलीमध्ये वरोरा शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी, तसेच विविध सामाजिक,माजी सैनिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक व पर्यावरणीय संघटना, व्यापारी बांधव, महिला भगिनी, युवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने व पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. करण देवतळे यांनी केले आहे.

तिरंगा हा देशाच्या स्वाभिमान, एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे. त्यामुळे वरोरावासीयांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशभक्तीची भावना अधिक बळकट करावी आणि ही तिरंगा रॅली ऐतिहासिक व भव्यदिव्य करावी, असे आवाहन आ. देवतळे यांनी केले आहे.


🇮🇳 हर घर तिरंगा! | तिरंगा यात्रा 🇮🇳

घरोघरी तिरंगा फडकवूया, राष्ट्रभक्ती जोपासूया! 
📅 दिनांक: १३ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: दुपारी २:०० वाजता
📍 स्थळ:शहीद योगेश डाहूले स्मारक, वरोरा

🇮🇳 या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊया! 🇮🇳
..........

Comments