लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात २४ ऑगस्टला महाकाल कावड यात्रेचे आयोजनडॉ. आंबेडकर चौकातून होणार यात्रेला प्रारंभ; भटाळा येथे महादेवाचा जलाभिषेक.

वरोऱ्यात २४ ऑगस्टला महाकाल कावड यात्रेचे आयोजन
डॉ. आंबेडकर चौकातून होणार यात्रेला प्रारंभ; भटाळा येथे महादेवाचा जलाभिषेक

वरोरा | प्रतिनिधी
दिनांक : २० ऑगस्ट २०२६

श्रावण महिन्याच्या पावन पर्वानिमित्त जागृती फाउंडेशन प्रणीत महाकाल कावड यात्रा समितीच्या वतीने यंदाही महाकाल कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुसऱ्या श्रावणी सोमवारी ही कावड यात्रा काढण्यात येणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांसाठी ही धार्मिक आणि भक्तिमय यात्रा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
गतवर्षी चंद्रपूर जिल्ह्यातून पहिल्यांदाच महाकाल कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदाही ही परंपरा पुढे सुरू ठेवण्यात आली आहे.
डॉ. आंबेडकर चौकातून यात्रेला प्रारंभ
सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता डॉ. आंबेडकर चौक येथे विधिवत पूजा-अर्चना करून महाकाल कावड यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पायदळ कावड यात्रा डॉ. आंबेडकर चौक, सपाटे चौक, शहीद स्मारक चौक, रत्नमाला चौक, आनंदवन चौक, चिमूर रोडमार्गे खैरगाव, परसोडा, रानतळोधी, खतोडा, सालोरी असा प्रवास करीत भटाळा येथील शिवमंदिरात पोहोचणार आहे.

पवित्र नद्यांच्या जलाने होणार जलाभिषेक
भटाळा येथील शिवमंदिरात पोहोचल्यानंतर गंगा, नर्मदा, शिप्रा, गोदावरी आदी पवित्र नद्यांचे जल घेऊन भगवान महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात येणार आहे. भटाळा येथील मंदिरातील शिवलिंग विदर्भातील मोठ्या शिवलिंगांपैकी एक असल्याने या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
..........

Comments