लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा पोलिसांची दारूविरोधी धडक कारवाई; पाच ठिकाणी गुन्हे दाखल, १५९ देशी दारूच्या बाटल्या जप्त.माढेळी, खांबाळा, बारव्हा व नागरी परिसरात कारवाई; महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हे.मात्र ज्या दुकानातून बिना परवाना दारू घेतात त्या दुकानावर अजूनही कारवाई नाही.

वरोरा पोलिसांची दारूविरोधी धडक कारवाई; पाच ठिकाणी गुन्हे दाखल, १५९ देशी दारूच्या बाटल्या जप्त.

माढेळी, खांबाळा, बारव्हा व नागरी परिसरात कारवाई; महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हे.

मात्र ज्या दुकानातून बिना परवाना  दारू घेतात त्या दुकानावर अजूनही कारवाई नाही. 

वरोरा, दि. ११ ऑगस्ट २०२६ : वरोरा पोलिसांनी अवैध देशी दारू विक्रीविरोधात कारवाई करत विविध ठिकाणी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ९ ऑगस्ट २०२६ रोजी माढेळी, खांबाळा व बारव्हा परिसरात तर १० ऑगस्ट रोजी नागरी येथे कारवाई करण्यात आली. सर्व प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५(ई) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

माढेळी येथील पानठेल्यावर कारवाई करताना कमल  भांडेकर (वय ४९) याच्याकडून ९० मिलीच्या देशी दारूच्या ३८ बाटल्या, किंमत १,५२० रुपये, जप्त करण्यात आल्या. एफआयआरनुसार संबंधित व्यक्तीकडे दारू विक्रीबाबत कोणताही पास किंवा परवाना नसल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष लक्ष्मणराव वाकडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

खांबाडा येथील एका पानठेल्यावर केलेल्या कारवाईत मोहन  गेडाम (वय ४०) याच्याकडून ९० मिलीच्या देशी दारूच्या २५ बाटल्या, एकूण १,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  या प्रकरणातही महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक संतोष लक्ष्मणराव वाकडे यांच्याकडे आहे.

खांबाडा परिसरातील दुसऱ्या कारवाईत चंद्रकांत  बोरकर (वय ५२) याच्याकडून ९० मिलीच्या देशी दारूच्या १९ बाटल्या, किंमत ७६० रुपये, जप्त करण्यात आल्या.  या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सुखराज रामचरण यादव यांच्याकडे देण्यात आला आहे.

बारव्हा येथे करण्यात आलेल्या कारवाईत मंगेश मेश्राम (वय ४२) याच्याकडून ९० मिलीच्या देशी दारूच्या ६२ बाटल्या, एकूण २,४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  या कारवाईचा तपास पोलीस हवालदार अमोल मारोती नवघरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 नागरी येथे शेख ईजराईल ताजू शेख (वय ४६) याच्याकडून ९० मिलीच्या देशी दारूच्या १५ बाटल्या, किंमत ६०० रुपये, जप्त करण्यात आल्या. या प्रकरणातही कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल असून तपास पोलीस हवालदार प्रवीण तिरणकर यांच्याकडे आहे.

या पाचही कारवायांमध्ये मिळून १५९ बाटल्या म्हणजे सुमारे १४.३१ लिटर देशी दारू, एकूण ६,३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाल्याचे एफआयआरमधील नोंदींवरून दिसून येते.

अशा छोट्या दुकानदारांना शहरातून मोठ्या प्रमाणात देशी दारू सप्लाय केली जाते. बिना लायसन दारू पेट्या गाव खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जात असून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. मात्र अजून पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली नाही. 
...........................

Comments