लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा शहरात १२ ऑगस्टला श्री शनिदेव जन्मोत्सवशनी मंदिरात रात्री १२ वाजता जन्मोत्सव;

॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॥ श्री ज्ञानेश्वराय नमः ॥ ॥ श्री हनुमंताय नमः ॥

श्री शनिदेव जन्म उत्सव

वरोरा शहरात १२ ऑगस्टला श्री शनिदेव जन्मोत्सव

शनी मंदिरात रात्री १२ वाजता जन्मोत्सव; अभिषेक, होम, भजन व महाआरतीचे आयोजन.

वरोरा, दि. ११ ऑगस्ट २०२६ : चेतन लूतडे 

वरोरा शहरातील वार्ड परिसरातील श्री शनिदेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शनिदेव जन्मोत्सव यात्रा भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आली आहे. श्रावण कृष्ण पक्ष अमावस्या (वद्य ३०), बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजता श्री शनिदेव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शनिदेवाचा अभिषेक व होम करण्यात येणार आहे. त्यानंतर पूर्णाहुती, महाआरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल. तसेच रात्री ९ वाजता भजनाचा कार्यक्रम आणि रात्री १२ वाजता श्री शनिदेव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

साडेसाती सुरू असलेल्या भाविकांनी शनिदेवाचा अभिषेक व नवग्रह पूजा करण्याचे आवाहन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात नवग्रहाची पूजा केल्यास भक्तांना आध्यात्मिक समाधान व शुभफळ प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

कालसर्प दोष, पितृदोष व नागबली पूजन

मंदिराच्या सूचनेनुसार कालसर्प दोष, पितृदोष व नागबली पूजनासाठी उज्जैन (मध्यप्रदेश) येथील श्री महाकालेश्वर येथे पूजा करण्याची व्यवस्था/मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच दर शनिवारी श्री शनिदेवाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार असून, अभिषेक करू इच्छिणाऱ्या भाविकांनी पं. गोपाल शर्मा, पुजारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री शनिदेव जन्मोत्सवानिमित्त आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

...................

साडेसाती शनि - मेष राशीला १२ वा, मीन राशीला १ ला, २ रा शनि कुंभ राशीला निघता साडेसाती आहे. त्यांनी शनिचा अभिषेक करावे. त्या भक्तांनी दिनांक १२/०८/२०२६ रोज बुधवारला अभिषेक करावा. होम सुरु राहील, होम नवग्रहाची पुजा करावी. शनिच्या मुर्तीवर अभिषेक करावा.

​​

Comments