लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करून मारहाण; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करून मारहाण; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

वरोरा, दि. ७ ऑगस्ट २०२६ : वरोरा तालुक्यातील मजरा  येथे अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी वरोरा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात मुलीच्या वडिलांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या एफआयआरनुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास १७ वर्षीय मुलगी कॉलेजमधून बसने मजरा येथे घरी जात होती. बसमधून उतरल्यानंतर गावातील राकेश नामक व्यक्तीने तिचे नाव घेऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच चप्पल घेऊन मारण्यासाठी धावून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर मुलगी घरी जाऊन घडलेला प्रकार वडिलांना सांगितला.

मुलगी व तिचे वडील संबंधित व्यक्तीच्या घरी जात असताना  चौकात राकेश हातात काठी घेऊन आला. त्याने मुलीच्या वडिलांच्या हातावर काठीने मारहाण केली, तर मुलीला मांडीवर लाथ मारून तसेच मानेवर हाताने मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेत मुलीच्या पायाला दुखापत झाली असून तिच्या वडिलांच्या हाताला सूज आल्याचेही तक्रारीत सांगण्यात आले आहे. गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ चे कलम ७५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 118(1), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास हाती घेतला आहे.

.......

Comments