लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

१५ ऑगस्ट जवळ आला, तरी विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक किटची प्रतीक्षा.

१५ ऑगस्ट जवळ आला, तरी विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक किटची प्रतीक्षा.

क्वालिटी समाधानकारक नसल्याने टेंडर रद्द; री-टेंडरिंग सुरू, १५ ऑगस्टपूर्वी वाटपाचे प्रशासनाचे आश्वासन

वरोरा, दि. ८ ऑगस्ट २०२६ : शैक्षणिक सत्र सुरू होऊन बराच कालावधी उलटला असतानाही वरोरा नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व शैक्षणिक किट मिळालेले नाही. १५ ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना साहित्य देण्याचे नियोजन असताना टेंडर प्रक्रियेला विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेसह इतर शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश व शैक्षणिक किट खरेदी करण्याकरिता टेंडर काढण्यात आले होते. या प्रक्रियेदरम्यान गणवेश व शैक्षणिक किटची गुणवत्ता तपासण्यात आली. मात्र, संबंधित साहित्याची गुणवत्ता समाधानकारक नसल्याने टेंडर रद्द करण्यात आले असून आता पुन्हा री-टेंडरिंगची प्रक्रिया सुरू असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
वरोरा शहरातील नगरपालिकेच्या शाळांमध्ये जवळपास ८० विद्यार्थी नर्सरीमध्ये शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना गणवेश आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळणे अपेक्षित असताना अद्याप त्यांचे वाटप झालेले नाही.

याबाबत नगरपालिकेच्या उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती योगिता नेरकर यांनी सांगितले की, गणवेश व शैक्षणिक किटची गुणवत्ता समाधानकारक नसल्याने संबंधित टेंडर रद्द करण्यात आले आहे. सध्या री-टेंडरिंगची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होताच १५ ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य मिळणे आवश्यक असले तरी टेंडर प्रक्रिया आणि गुणवत्ता तपासणीच्या विलंबाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वापरावर होत आहे. त्यामुळे री-टेंडरिंगची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून दिलेल्या मुदतीत गणवेश व शैक्षणिक किटचे वाटप होते का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
........................................

Comments