लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांना ‘विदर्भभूषण’ पुरस्काराने सन्मानित

वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांना ‘विदर्भभूषण’ पुरस्काराने सन्मानित

वरोरा/चेतन लूतडे/६/८/२६
नागपूर, दि. ६ ऑगस्ट : अल इब्राहिम एज्युकेशन सोसायटी, नागपूर यांच्या वतीने वनामती सभागृह, नागपूर येथे विदर्भातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवर, उत्कृष्ट वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षणाच्या माध्यमातून विदर्भभर नावलौकिक मिळविणारे गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.

यावेळी वरोरा शहराचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांना सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान तसेच सर्वसामान्यांना सोबत घेऊन कार्य करणारे नेतृत्व म्हणून ‘विदर्भभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना समाजहित आणि देशहितासाठी कार्य करण्याची गरज अधोरेखित केली. "स्वतःसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही जगणे आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाणे ही आजच्या काळाची गरज आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
अल इब्राहिम एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षी विदर्भातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यावेळी अहेतेशाम अली यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अहेतेशाम अली यांनी अल इब्राहिम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी खान नायडू व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला दत्ता मेघे विद्यापीठाचे अध्यक्ष वेद प्रकाश मिश्रा, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. हसीन अख्तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, माजी विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा, सामाजिक कार्यकर्ते इकराम हुसेन (वर्धा) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
........


.        डॉक्टर असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले.

Comments