लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

प्रेमविवाहानंतर विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 'आत्महत्या नसून हत्या'चा वडिलांचा आरोप*

*प्रेमविवाहानंतर विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 'आत्महत्या नसून हत्या'चा वडिलांचा आरोप*

*वरोरा प्रतिनिधी :*

 वरोरा तालुक्यातील साखरा शिवारात २ ऑगस्ट रोजी एका विवाहितेचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मृत महिलेच्या वडिलांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

मृत महिला मयुरी हरिदास सूपारे (वय २६, रा. खेक, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) अशी ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी हिचे वरोरा तालुक्यातील साखरा येथील महेश गुलाब कावळे याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून मयुरी गर्भवती झाल्यानंतर मे महिन्यात दोघांनी प्रेमविवाह केला.

मयुरीच्या वडिलांच्या आरोपानुसार, विवाहानंतर तिचा जबरदस्तीने वरोरा तालुक्यातील शेगाव येथील एका खासगी डॉक्टरकडे अनधिकृत गर्भपात करण्यात आला. त्यानंतर सासरी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. महेश कावळे हा बुटीबोरी येथील एका खासगी कंपनीत काम करत असल्याने दोघे काही काळ तेथे वास्तव्यास होते. त्यानंतर महेशने मयुरीला माहेरी सोडले होते.

२ ऑगस्ट रोजी महेशने "वडिलांना भेटल्यानंतरच तुला परत ठेवतो" असे सांगून मयुरीला साखरा येथे बोलावले. त्यानुसार मयुरीचा भाऊ चेतन सूपारे याने सकाळी सुमारे ९.३० वाजता तिला साखरा येथे सोडले. मात्र दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना साखरा शेतशिवारातील झाडाला एका महिलेने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मयुरीचा मृतदेह आढळून आला.

मृत महिलेच्या वडिलांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला असून या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाचा तपास शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेंद्र शिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी महेश गुलाब कावळे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे

Comments