लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जुन्या वादातून दोघांकडून मजूर व मुलावर काठी-बॅटने हल्ला; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

जुन्या वादातून दोघांकडून मजूर व मुलावर काठी-बॅटने हल्ला; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

वरोरा, दि. ३० जुलै : वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माढेळी येथे जुन्या वादातून एका मजूर व त्याच्या मुलावर काठी व क्रिकेट बॅटने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वरोरा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० वाजताच्या दरम्यान घडला असून त्याच दिवशी रात्री १०.३५ वाजता एफआयआर नोंदविण्यात आला. 

तक्रारदार दादाजी बालाजी बोढे (वय ५९, रा. माढेळी, ता. वरोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातील जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी श्रीकांत श्यामराव बोढे व किशोर श्यामराव बोढे यांनी त्यांच्याशी वाद घालत काठी व बॅटने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. या घटनेत दोघांनाही दुखापत झाली असून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ३(५), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भाऊराव गौरकर करीत आहेत.
........
.             नगरपालिकेतर्फे जमिनीचे पट्टेवाटप

Comments