लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा नगरपालिकेकडून ६०-७० वर्षांपासून राहणाऱ्या अतिक्रमित नागरिकांना कायम पट्ट्यांचे वाटप; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण.

वरोरा नगरपालिकेकडून ६०-७० वर्षांपासून राहणाऱ्या अतिक्रमित नागरिकांना कायम पट्ट्यांचे वाटप; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

​वरोरा (प्रतिनिधी): चेतन लूतडे 

वरोरा नगरपालिका क्षेत्रातील कालोरी वार्ड, कर्मवीर वार्ड, आझाद वार्ड, राजीव गांधी वार्ड, मालवीय वार्ड आणि हनुमान वार्ड या भागांत गेल्या ६० ते ७० वर्षांपासून अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना अखेर मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
​गेल्या अनेक दशकांपासून आमदार, खासदार, नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांना पट्टे देण्याचे आश्वासन दिले जात होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही होत नव्हती. अतिक्रमाचा ठप्पा असल्यामुळे या रहिवाशांना पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना किंवा शबरी आवास योजना यांसारख्या शासकीय योजनांचा आणि घरकुलाचा लाभ मिळत नव्हता. तसेच कर पावती असूनही इतर मूलभूत सोयी-सुविधांपासून त्यांना वंचित राहावे लागत होते.
​शासनाच्या धोरणानुसार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार, प्रतिभाताई धानोरकर स्थानिक आमदार करण देवतळे तसेच नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांच्या  विशेष पुढाकाराने २०११ पूर्वीच्या अतिक्रमितधारकांना पट्टे वाटप करण्याचे धोरण राबवण्यात आले. त्यानुसार नगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.
 "हा दिवस या सर्व गरीब व अतिक्रमितधारकांसाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा ठरला असून उर्वरित पात्र नागरिकांची कागदपत्रे लवकरात लवकर तयार करून शहरातील  अतिक्रमितधारकांना कायम पट्टे दिले जातील असे मत नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी व्यक्त केला.

नगरपालिकेने आयोजित केलेल्या   पट्टेवाटप कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे खासदार प्रतिभाताई धानोरकर ,कार्यक्रमाचे अध्यक्ष करण देवतळे, नगराध्यक्ष अर्चनाताई ठाकरे, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, उपविभागीय अधिकारी , तहसीलदार, तसेच नगरसेवक , पट्टे धारक  उपस्थित होते.

........


Comments