लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

"अतिक्रमणामुळे नाल्याचा प्रवाह अडला; थोड्याशा पावसानेही वरोरा शहरात पाणी शिरण्याचा धोका"

अतिक्रमणामुळे नाल्याचा प्रवाह अडवला; थोड्या पावसानेही शहरात पाणी शिरण्याचा धोका!


लेआउट धारकाने नैसर्गिक प्रवाह अडवल्याने पूरस्थितीचा धोका.

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे भिंत काढण्याचे तातडीचे आदेश.

स्थानिक प्रतिनिधी: वरोरा 

वरोरा ​शहरातील माढेळी नाका मुख्य नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे थोड्याशा पावसानेही नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या समस्येची गंभीर दखल घेत खासदार प्रतिभाताई धानोरकर  आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकतीच पाणी साचणाऱ्या प्रमुख भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.

​शहरातून प्रामुख्याने संस्कार भारती शाळे समोरील कोराडी नाला आणि कासम पंजाब नाला हे दोन मोठे नाले वाहतात. प्रभाग क्रमांक १ कडून येणारे पाणी (मालवी वार्ड, खानजी वार्ड, शुभम नगर, कासम पंजा परिसर आणि आलिशान नगर) या मुख्य नाल्यांमधून बाहेर पडते.

​मात्र, मांढेळी रोड परिसरातील एका प्रायव्हेट ले-आऊट धारकाने (DSK कंपनीच्या ले-आऊटजवळ) भिंत बांधून शहराच्या मुख्य नाल्याचा प्रवाह अडवल्याचा आरोप केला जात आहे. नाल्याला मार्ग उपलब्ध नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी माघारी फिरून (उलटं पाणी) शहरात व नागरी वस्त्यांमध्ये साचत आहे.


​या समस्येचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर , नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, उपविभागीय अधिकारी (SDM) आणि तहसीलदार यांनी संयुक्तपणे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली:

यावेळी अडवलेला पाण्याचा प्रवाह तातडीने मोकळा करण्याचे निर्देश खासदारांनी दिले आहेत.

तसेच वर्धा नदीपर्यंत पाणी सुलभतेने जावे यासाठी दोन्ही मुख्य नाल्यांचे पक्के बांधकाम करणे .

 तांत्रिक पाहणी करून नाल्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले.

.............

Comments