लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; 61,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वरोऱ्यात अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; 61,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वरोरा, दि. 22 ऑगस्ट 2026 : वरोरा पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत दोन जणांकडून देशी दारूच्या 45 सीलबंद बाटल्या आणि विनाक्रमांकाची मोपेड स्कूटी असा एकूण 61 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी मौजा बारव्हा येथील राणी दुर्गावती स्मारक परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश डोमाजी मेश्राम (वय 42) आणि दिवाकर सुरेश मडावी (वय 40), दोघे रा. बारव्हा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, हे विनाक्रमांकाच्या मोपेड स्कूटीने अवैधरीत्या दारू विक्री करण्याच्या उद्देशाने दारू घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी राणी दुर्गावती स्मारकाजवळील परिसरात नाकाबंदी केली. यावेळी दोघे संशयित मोपेडवर बसलेले आढळून आले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या जवळील पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 45 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत 1,800 रुपये, तर विनाक्रमांकाच्या मोपेडची किंमत 60 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दारू बाळगण्याबाबत आवश्यक परवाना मागितला असता संबंधितांकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दारू व मोपेड असा एकूण 61,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 मधील कलम 65(अ) व 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भाऊराव गौरकर करीत आहेत. तक्रार पोलीस हवालदार विक्की सदाशिवराव करपे (ब. नं. 732) यांनी दिली.

Comments