लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*वरोरा पोलिसांचे सामाजिक बांधिलकी; ४१ पोलिस कर्मचाऱ्यांचे रक्तदान*

वरोरा पोलिसांचे सामाजिक बांधिलकी; ४१ पोलिस कर्मचाऱ्यांचे रक्तदान

वरोरा | प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलीस व चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी वरोरा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान हेच जीवनदान’ असा संदेश दिला.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जीवन ज्योती ब्लड सेंटर अँड कंपोनंट्स यांच्या माध्यमातून रक्तसंकलनाची व्यवस्था करण्यात आली होती.

गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. रक्ताचा प्रत्येक थेंब गरजू रुग्णासाठी जीवनदायी ठरू शकतो, या भावनेतून पोलिसांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

वरोरा पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांनाही रक्तदानासारख्या सामाजिक व मानवतावादी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत ४१ जणांनी रक्तदान केल्याने त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments