लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांविरुद्ध वरोरा पोलिसांची कारवाई; महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 अंतर्गत गुन्हा दाखल.

संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांविरुद्ध वरोरा पोलिसांची कारवाई; महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 अंतर्गत गुन्हा दाखल.

वरोरा | दि. ६ ऑगस्ट २०२६
वरोरा शहरातील रत्नमाला चौक परिसरात मध्यरात्री संशयास्पद हालचाली करताना आढळलेल्या दोघांविरुद्ध वरोरा पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १२२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा वरोरा पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ०८६९ म्हणून नोंदविण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ ऑगस्टच्या रात्री ते ६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत सुरू असलेल्या रात्रगस्ती दरम्यान पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे व त्यांच्या पथकाला पहाटे सुमारे २.३९ वाजता रत्नमाला चौक येथील बसस्टॉपजवळ दोन इसम संशयास्पदरीत्या लपून बसलेले दिसले. दोघेही इसम वरोरा येथील असून चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

चौकशीदरम्यान दोघेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन  हस्तक्षेपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते परिसरात वावरत असल्याचा संशय पोलिसांना आल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १२२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. 
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक महादेव ढोके करीत आहेत. 

..................

Comments