लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

NEET गैरव्यवहाराविरोधात वरोऱ्यात युवकांचा एल्गार; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीडॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने; तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर.

NEET गैरव्यवहाराविरोधात वरोऱ्यात युवकांचा एल्गार; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने; तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर

वरोरा, प्रतिनिधी : चेतन लूतडे 

 वरोरा शहरात बुधवारी मोठ्या प्रमाणावर युवक-युवती रस्त्यावर उतरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य निदर्शने आंदोलनात  NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा निषेध करण्यात आला. तसेच दिल्लीतील जंतरमंतर येथे न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा", "NEET परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा" अशा घोषणा देत युवकांनी आपला संताप व्यक्त केला. आंदोलनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संबंधित मंत्रालयाला पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा द्यावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडले. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहील. या आंदोलनामुळे वरोरा शहरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत जनजागृती झाली असून युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात एकजूट दिसून आली.

Comments