वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोऱ्यात रेती चोरीचा प्रयत्न उधळला; नंबर नसलेला ट्रॅक्टर व MH-34 , A-4321 ट्रॉलीसह ₹5.07 लाखांचा मुद्देमाल जप्त


वरोऱ्यात रेती चोरीचा प्रयत्न उधळला; नंबर नसलेला ट्रॅक्टर व MH-34 , A-4321 ट्रॉलीसह ₹5.07 लाखांचा मुद्देमाल जप्त

वरोरा, दि. 16 जुलै :
वरोरा शहरातील संस्कार भारती पब्लिक स्कूलजवळ सुरू असलेल्या रस्ता व नाली बांधकामाच्या ठिकाणी अज्ञात तिघांनी रेती चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 16 जुलै रोजी मध्यरात्री घडली.

 फिर्यादी व त्यांच्या चालकाने घटनास्थळी धाव घेतल्याने आरोपी नंबर नसलेला मेसी फर्गुसन कंपनीचा ट्रॅक्टर व MH-34 A-4321 क्रमांकाची ट्रॉली घटनास्थळीच सोडून पसार झाले. पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा सुमारे ₹5.07 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फिर्यादी संजय कवडूजी जुनघरे (वय 53, रा. संताजी नगर, वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बांधकामासाठी आणलेली रेती वारंवार चोरीला जात असल्याने त्यांनी चालकासह घटनास्थळी पाळत ठेवली होती. 16 जुलै रोजी रात्री सुमारे 12.30 वाजता लाल रंगाचा ट्रॅक्टर व तिघेजण रेती भरत असताना ते घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहताच आरोपी ट्रॅक्टर व ट्रॉली जागीच सोडून पळून गेले. त्यानंतर डायल 112 वर माहिती देण्यात आली.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 303(2), 62 आणि 3(5) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 



Comments