लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे सीबीएसई क्लस्टर-IX व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे सीबीएसई क्लस्टर-IX व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

वरोरा, दि. २५ जुलै : संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे आयोजित सीबीएसई क्लस्टर-IX व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा आज उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली तसेच दमण दीव येथील विविध सीबीएसई संलग्न शाळांमधून सुमारे ६०० विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत प्रशिक्षक, व्यवस्थापक, दिल्लीहून आलेली सीबीएसई अधिकृत टीम, तसेच सीबीएसई निरीक्षक श्री. मुकुंद झाला उपस्थित आहेत. ही स्पर्धा सीबीएसईच्या क्रीडा दिनदर्शिकेनुसार आयोजित करण्यात आली आहे.

उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून वरोरा शहराच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना ठाकरे उपस्थित होत्या. मान्यवर पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. माणकचंदजी मालू, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक सल्लागार श्री. अनिल डोंगरे, श्री गजानन जिवतोडे, श्री अक्षय भिवदरे, श्री सुनील बांगडे, श्री हेमंत गिव्हे, श्री निखिल बोबडे, श्री. गणेश मुसळे व शाळेतील संचालक मंडळ विराजमान होते. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या राणी पटेल व उपप्राचार्या श्रद्धा चौबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना क्रीडाभावना, शिस्त, संघभावना आणि प्रामाणिक प्रयत्न यांचे महत्त्व पटवून देत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या वतीने सर्व सहभागी खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, सीबीएसई अधिकारी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उद्घाटनानंतर स्पर्धेतील सामन्यांना उत्साहात प्रारंभ झाला. सदर  कार्यक्रमाचे संचलन व आभार वर्धन खारकर व पूर्वी लोया यांनी केले.सदर स्पर्धेसाठी शाळेतील शारीरिक शिक्षण व क्रिडा विभाग  व  सांस्कृतिक विभाग आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकार्य करीत आहे.

Comments